दहावी बारावीच्या आज होणाऱ्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलल्या



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा तर्फे
शुक्रवारी होणारा दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे.
राज्यात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे .
त्यामुळे दहावीचा शुक्रवारी (ता.28,) होणारा पेपर पुढे ढकलण्यात आला असून हा पेपर आता 3 ऑगस्ट रोजी होणार आहे.

राज्य शिक्षण मंडळामार्फत जुलै ऑगस्ट 2023 मधील दहावी - बारावी ची पुरवणी परीक्षा सध्या सुरू आहे. यात दहावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट , तर बारावीची 18 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत होत आहे परंतु राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे काही शाळा, महाविद्यालयांना सुटी देखील जाहीर केली आहे.